क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..प्रार्थना बेहरेने साडीत केलं ग्लॅमरस फोटोशूट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:46 IST2021-02-16T12:25:48+5:302021-02-16T14:46:45+5:30
Prarthana Behere looks beautiful in saree : प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..प्रार्थना बेहरेने साडीत केलं ग्लॅमरस फोटोशूट !
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. प्रार्थना आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटला घेऊन सोशल मीडियावर अलीकडे चर्चेत असते. प्रार्थनाने गोल्डन रंगाच्या साडीत फोटोशूट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. गोल्डन रंगाच्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनाचे हे फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.
त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.