दुनियादारी फेम प्रणव रावराणेची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 07:15 IST2020-01-06T07:15:00+5:302020-01-06T07:15:02+5:30
प्रणवची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

दुनियादारी फेम प्रणव रावराणेची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो
एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वाऱ्यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये प्रणव रावराणेने काम केले आहे. दुनियादारी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात त्याने साकारलेली सॉरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. प्रणव रावराणे याची मराठी जगतात उत्तम कॉमेडी कलाकार म्हणून ख्याती आहे.
प्रणव रावराणे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'आटपाडी नाईट्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात प्रणव एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्या ‘वासूची सासू’ या नाटकात थोडाफार बदल करून हीच भूमिका प्रणवणे सादर केली होती. या नाटकातील त्याच्या भूमिकाल प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. नाटकासोबतच अनेक मराठी चित्रपटात त्याने काम केले आहे. भागमभाग, आबांनी उडवला बार, हिप हिप हुर्रे, धाव मन्या धाव यातील भूमिका त्याने उत्कृष्टरित्या साकारल्या.
प्रणवसोबतच त्याची पत्नी देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे. प्रणवची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. प्रणवचे डिसेंबर २०१७ मध्ये अमृता सकपाळसोबत लग्न झाले होते. अमृता ही देखील एक अभिनेत्री असून तिने माझे मन तुझे झाले या मालिकेत काम केले होते. तसेच ऑल द बेस्ट नाटकात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यांना एक मुलगीदेखील असून त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या मुलीचे फोटो पाहायला मिळतात.