/> कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल मधुन स्वत:साठी वेळ काढणे बºयाचदा शक्य होत नाही. सतत लाईट्स..कॅमेरा..अॅक्शनच्या झगमगाटी दुनियेत वावरताना मनावर स्ट्रेस तर नक्कीच येतो. मग या तणावातून रिलॅक्स होण्यासाठी मस्तपैकी कुठेतरी लाँग हॉलिडेवर जाण्याची इच्छा तर होणार ना. आता हेच पहा ना जुळून येती रेशीमगाठी मधील आपली सोज्वळ मेघना म्हणजेच प्राजक्ता माळी नूकतीच उत्तराखंडला जाऊन झक्कास अँडव्हेंचर ट्रीप करुन आली आहे. प्राजक्ता तिच्या या ट्रीप विषयी सीएनएक्सला तिचे अनुभव भरभरुन सांगत आहे. ती म्हणते, गेल्या दोन वर्षात सिरिअल करीत असताना मला कुढे फिरायला जाता आले नाही. मला पहिल्यापासुनच भारत भ्रमण करायचे होते. गोवा,केरळ,तामिळनाडु सोडले तर मी भारतात कुठेच फिरले नाही. शो अन कामाच्या निमित्ताने कतार, युरोप, अमेरिकेला जाऊन आले होते. परंतू यामध्ये माझे भारतभ्रमण राहुन गेले होते. आता माझी सिरिअल संपली अन थोडा वेळ होता तर मी उत्तराखंडला जायचे ठरवले. एका ट्रेकिंग ग्रुप सोबत मी डेहरादुन, ऋषीकेश, हरिद्वारला गेले. तिथे आम्ही रिवर राफटींग केले तो अनुभव तर सगळ््यात भारी अन मेमोरेबल होता. तसेच गंगेच्या थंड पाण्यात डुबकी मारताना आलेली मजा अन तो क्षण कधीच विसरु शकणार नाही. आता दरवर्षी एक तरी राज्य फिरण्याचे मी ठरविले आहे. प्राजक्ताचा हा भारतभ्रमणाचा संकल्प पुर्ण होऊ देत अशा सीएनएक्स टिम कडुन तिला शुभेच्छा
![]()
Web Title: Prajakta's Adventures Trip
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.