प्राजक्ता शुक्रेचे नवे गाणे 'विनायका प्रभुराया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:41 IST2018-09-20T13:37:08+5:302018-09-20T13:41:20+5:30

मराठी आणि बॉलिवूडची प्रख्यात गायिका प्राजक्ता शुक्रे हिचा गणेशोत्सवा निमित्ताने नवा अल्बम रसिकांच्या भेटीला आला आहे.

Prajakta Shukre new song 'Vinayaka Prabhuraya' | प्राजक्ता शुक्रेचे नवे गाणे 'विनायका प्रभुराया'

प्राजक्ता शुक्रेचे नवे गाणे 'विनायका प्रभुराया'

ठळक मुद्दे 'विनायका प्रभुराया' गाण्याबाबत प्राजक्ता उत्साही

मराठी आणि बॉलिवूडची प्रख्यात गायिका प्राजक्ता शुक्रे हिचा गणेशोत्सवा निमित्ताने नवा अल्बम रसिकांच्या भेटीला आला आहे. 'विनायका प्रभुराया' असे या गाण्याचे नाव असून या नव्याकोऱ्या ट्रॅकचा शुभारंभ विंक म्युझिक अॅपवर करण्यात आला. विंक बिट्सवर खास भारतीयांसाठी सादर करण्यात येणाऱ्या सात गाण्यांच्या सीरिजमधील श्रीगणेशावर आधारलेले हे पहिले गाणे असेल. 

प्राजक्ता शुक्रेने पहिल्यांदाच विंक म्युझिकबरोबर भागीदारी केली आहे. विनायका प्रभुराया हे गाणे भारताचे आराध्य दैवत, कला सर्जनशीलता आणि ज्ञानाचा अधिपती गणपती बाप्पावर आधारलेले आहे. या देवाची पूजा कोणत्याही विशिष्ट जाती-समुदायासाठी मर्यादित नाही, तो सर्व विघ्ने दूर करणारा आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर १ दशलक्षहून अधिक लोकांनी त्याचे स्ट्रिमिंग केले असून प्रादेशिक प्रकारात त्याची लोकप्रियता वाढताना दिसते.
माझा ट्रॅक 'विनायका प्रभुराया'च्या लाँचिंगमुळे मी फारच उत्साही आहे, खासकरून भारतातील विंक युजर्ससाठी. मी विंक म्युझिकचे आभार मानते. विशेषत: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी मला माझ्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. मला आशा आहे की चाहत्यांना हा ट्रॅक नक्कीच भावेल. 'विनायका प्रभुराया' या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांची आभारी आहे.संपर्कात रहा, विंक म्युझिकवर आणखी काहीतरी घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईन, असे प्राजक्ता शुक्रे म्हणाली. 

Web Title: Prajakta Shukre new song 'Vinayaka Prabhuraya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.