प्राजक्ता माळीचा १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो तुम्हालाही आवडेल, भरतनाट्यमच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 16:09 IST2018-12-29T16:08:50+5:302018-12-29T16:09:49+5:30

प्राजक्ताचा हा फोटो १५ वर्षांपूर्वीचा आहे. अरंगेत्रमचा हा फोटो असून त्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत यावर विश्वासच बसत नसल्याचे तिने म्हटलंय.

Prajakta Mali’s this photo you will like, shares her memory about bharatnataym | प्राजक्ता माळीचा १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो तुम्हालाही आवडेल, भरतनाट्यमच्या आठवणींना उजाळा

प्राजक्ता माळीचा १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो तुम्हालाही आवडेल, भरतनाट्यमच्या आठवणींना उजाळा

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

नुकताच प्राजक्ताने स्वतःचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमातील हा फोटो आहे. पारंपरिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. शिवाय दागदागिने आणि मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. प्राजक्ताचा हा फोटो १५ वर्षांपूर्वीचा आहे. अरंगेत्रमचा हा फोटो असून त्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत यावर विश्वासच बसत नसल्याचे तिने म्हटलंय.

“भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी अरंगेत्रम सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. यावेळी जे काही शिक्षण घेतलं ते गुरूला अर्पण करून स्वतःचा वेगळा प्रवास सुरू करता” असं तिने फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. प्राजक्ता लवकरच डोक्याला शॉट या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. सुव्रत जोशी आणि रोहित हळदीकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Prajakta Mali’s this photo you will like, shares her memory about bharatnataym