गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय प्राजक्ता माळी, फोटो शेअर करत म्हणाली - तेरे बिन नहीं लगता दिल मेरा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 07:00 IST2020-11-04T07:00:00+5:302020-11-04T07:00:02+5:30

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

Prajakta mali who looks stunning in a pink dress | गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय प्राजक्ता माळी, फोटो शेअर करत म्हणाली - तेरे बिन नहीं लगता दिल मेरा....

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय प्राजक्ता माळी, फोटो शेअर करत म्हणाली - तेरे बिन नहीं लगता दिल मेरा....

 प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.  आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते .प्राजक्ताने नुकतेच गुलाबी रंगाच्या ड्रेसमधले  तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहे. जानिया.. हानिया ..तू वि सिख कडी़ दु:ख सुख बोलना...तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना. असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. 

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

Web Title: Prajakta mali who looks stunning in a pink dress