प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:19 IST2025-06-20T14:17:47+5:302025-06-20T14:19:31+5:30

Prajakta Mali : नुकतेच प्राजक्ताने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचं दर्शन घेतलं. तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेमधील अकराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं.

Prajakta Mali visited Kedarnath with her family, Amrita Khanvilkar also participated in the pilgrimage | प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी

प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतेच प्राजक्ताने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचं दर्शन घेतलं. तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेमधील अकराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं. यावेळी या यात्रेत तिच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)देखील सहभागी झाली होती. प्राजक्ता माळीने या यात्रेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर केदारनाथचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता माळीसोबत तिचे कुटुंबदेखील यावेळी पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोत अमृता खानविलकरदेखील पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, श्री केदारनाथ… रुद्रप्रयाग- उत्तराखंड. अशा प्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ; ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडले. यावेळी कुटूंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे. #यात्रा #ज्योतिर्लिंग #केदारनाथ. प्राजक्ताच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.


वर्कफ्रंट
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. शेवटची प्राजक्ता चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या आधी ती तिची पहिली निर्मिती असलेल्या फुलवंती सिनेमात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

Web Title: Prajakta Mali visited Kedarnath with her family, Amrita Khanvilkar also participated in the pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.