तुमची लाडकी प्राजक्ता माळी सध्या करते या देशाची भटकंती, पाहा तिचे Vacation Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:35 IST2020-01-29T16:34:31+5:302020-01-29T16:35:07+5:30
प्राजक्ता माळीने जगातील सर्वात मोठा असलेला अॅक्वॉरियमला भेट देत तेथील काही खास गोष्टी कॅमे-यात कॅप्चर केल्या आहेत. प्राजक्ताच्या

तुमची लाडकी प्राजक्ता माळी सध्या करते या देशाची भटकंती, पाहा तिचे Vacation Photo
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. अभिनयासोबतच अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही भटकंतीची फार आवड आहे. त्यामुळे दुबईमध्ये ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
काही दिवसांपूर्वी तिचे युरोप इजिप्त टूरचे फोटोही चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर आता ती दुबईमध्ये भटकंती करत आहे. यावेळी तिने वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली. प्राजक्ताने जगातील सर्वात मोठा असलेला अॅक्वॉरियमला भेट देत तेथील काही खास गोष्टी कॅमे-यात कॅप्चर केल्या आहेत. प्राजक्ताच्या या व्हिडीओ आणि फोटोंना नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.