फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे मराठी इंडस्ट्रितील टॉपची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:37 IST2020-04-06T17:18:34+5:302020-04-06T17:37:30+5:30

सो क्युट, खूप छान, खूप मस्त अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर केल्या आहेत

Prajakta mali share her childhood pic during lockdown | फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे मराठी इंडस्ट्रितील टॉपची अभिनेत्री

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे मराठी इंडस्ट्रितील टॉपची अभिनेत्री

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही प्राजक्ता माळी आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.


देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले आणि सर्वांना घरातच थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे बॉलिवूडपासून मराठी कलाकारांनी स्वत:ला घरात सेल्फ क्वारांटाईन करुन घेतले आहे. सोशल मीडियावर ते फॅन्सशी संवाद साधतात. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्राजक्ता खूप क्युट दिसते आहे. फॅन्सनी सो क्युट, खूप छान, खूप मस्त अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर केल्या आहेत. या आधी प्राजक्ताने किचन मधले जेवण करतानाचे फोटो देखील शेअर केले होते. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. 

Web Title: Prajakta mali share her childhood pic during lockdown