प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:14 IST2023-12-25T13:11:48+5:302023-12-25T13:14:20+5:30

देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे.

Prajakta Mali received a special Christmas gift share post on instagram | प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. वर्षभर शेवटच्या सणाची म्हणजे ख्रिसमसची लोक वाट पाहत असतात. विशेष म्हणजे ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्ट पर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीला खास ख्रिसमस  गिफ्ट मिळालं आहे. सोशल मीडियावर तिने पोस्ट करत ही माहिती दिली. 

प्राजक्ता माळीचं ख्रिसमस गिफ्ट म्हणजे तिचे इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. हे तिचं ख्रिसमस गिफ्ट असल्याचं तिने म्हटलं. तिने पोस्टमध्ये लिहले, 'आणि मला ख्रिसमस भेट मिळालं. आज आपण 2.1 मिलियनचं इंस्टा कुटुंब झालो आहोत. तर मग या आनंदात मी २१ च्या ऐवजी आज “जागतिक साडी दिन” साजरा करते. यावर्षी साडी माझ्यासाठी खूप खास राहिली आहे. मग साडी दिवस साजरा न करणे अन्यायकारक राहिल नाही का.  माझ्यावर कायम प्रेम केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार'.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती तिच्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते, त्याबरोबरच मजेदार कॅप्शनही देते. मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली.  तर ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली.  प्राजक्ता ही फक्त अभिनेत्री नसून आता ती उद्योजिका म्हणून नवं काम सुरू केलं आहे. तिचा प्राजक्तराज हा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे.  
 

Web Title: Prajakta Mali received a special Christmas gift share post on instagram