ओळखलंत का कोण आहे ही मराठी अभिनेत्री ?, आपल्या हॉट लूकने देत भल्याभल्यांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 17:11 IST2019-10-31T17:08:28+5:302019-10-31T17:11:36+5:30

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच  अॅक्टिव्ह असते.

Prajakta mali looks hot in red dress | ओळखलंत का कोण आहे ही मराठी अभिनेत्री ?, आपल्या हॉट लूकने देत भल्याभल्यांना टक्कर

ओळखलंत का कोण आहे ही मराठी अभिनेत्री ?, आपल्या हॉट लूकने देत भल्याभल्यांना टक्कर

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच  अॅक्टिव्ह असते.

आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.

नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय. प्राजक्ताने तिचा लाल गाऊन मधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती स्टनिंग दिसतेय. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ब्युटीफूल, लायभारी, क्लासी अशा वेगवेगळ्या कमेंट्स प्राजक्ताच्या फोटोवर आल्या आहेत. 


मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.          

Web Title: Prajakta mali looks hot in red dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.