केसांचा कोंबडा छान केलाय, मजेदार कॅप्शन देत प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 13:05 IST2021-06-19T12:59:02+5:302021-06-19T13:05:10+5:30

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.

Prajakta Mali flaunts his new unique hairstyle Know How Her Father Reacted | केसांचा कोंबडा छान केलाय, मजेदार कॅप्शन देत प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो

केसांचा कोंबडा छान केलाय, मजेदार कॅप्शन देत प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 

 प्राजक्ता माळीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने प्राजक्ताचीही एक वेगळी स्टाईल आहे. फॅशन आणि ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा काही तरी स्वतःचे हटके स्टाईल करताना ती दिसते. जी गोष्ट तिला भावते, जी आवडते, तीच तिच्यासाठी स्टाईल असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने साडी परिधान केली असली तरी हटके हेअर स्टाइल केली आहे.

यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.स्टायलिश दिसण्यासाठी विविध प्रयोग करताना प्राजक्ता माळी दिसते. यावेळीही तिने हटके प्रयोग केल्याचे पाहायला मिळतंय. हा फोटो शेअर करत तिने मेजशीर कॅप्शनही दिली. कॅप्शन सोशल मीडियावर नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतल असली तरी फोटोही तितकेच सुंदर आहेत. 

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

Web Title: Prajakta Mali flaunts his new unique hairstyle Know How Her Father Reacted