"ही हॉलिवूडची हिरोईन कोण?" मराठमोळ्या प्राजक्ताचा भलताच बोल्ड अंदाज, व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 15:00 IST2024-04-20T14:59:53+5:302024-04-20T15:00:28+5:30

मराठमोळ्या प्राजक्ताचा भलताच बोल्ड अंदाज, चाहते म्हणतात, "ही तर हॉलिवूडची..."

prajakta mali bold and hot look in metalic dress for filmfare award fans reacted on video | "ही हॉलिवूडची हिरोईन कोण?" मराठमोळ्या प्राजक्ताचा भलताच बोल्ड अंदाज, व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

"ही हॉलिवूडची हिरोईन कोण?" मराठमोळ्या प्राजक्ताचा भलताच बोल्ड अंदाज, व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ताच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात. नुकतंच प्राजक्ताने फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात प्राजक्ताने तिच्या दिलखेचक अदांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 

फिल्मफेअर पुरस्कारांसाठी प्राजक्ताने खास लूक केला होता. मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान करत प्राजक्ताने बोल्ड लूक केला होता. केस मोकळे सोडल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली. या पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताने तिच्या डान्सनेही प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, तिच्या या मॉर्डन आणि हॉट लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन या लूकमधील एक व्हिडिओ शेअर आहे. या व्हिडिओत ती फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. 

प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. "ही हॉलिवूड अभिनेत्री कोण आहे?", "अप्सरा आली", "स्टनिंग", "किती सुंदर" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर अभिनेत्री अमृता खानविलकर आणि क्रांती रेडकरनेही प्राजक्ताच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. "केस छान दिसत आहेत", असं दोघींनी म्हटलं आहे. 

सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तिने अनेक मराठी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. प्राजक्ताने पांडू सिनेमात खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

Web Title: prajakta mali bold and hot look in metalic dress for filmfare award fans reacted on video