प्राजक्ता हनमघर अडकली लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 10:27 IST2017-08-17T04:57:54+5:302017-08-17T10:27:54+5:30

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत प्राजक्ता हनमघर एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक ...

Prajakta Hanamghar stuck in a marriage ceremony | प्राजक्ता हनमघर अडकली लग्नबंधनात

प्राजक्ता हनमघर अडकली लग्नबंधनात

ा लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत प्राजक्ता हनमघर एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने या मालिकेसोबत अनेक कॉमेडी शोमध्ये देखील काम केले आहे. फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, ढाबळ यांसारख्या कार्यक्रमाद्वारे तिने आजवर प्रेक्षकांना खळखून हसवले आहे. सध्या ती कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील तिच्या विनोदी टायमिंगचे चांगलेच कौतुक केले जाते. प्राजक्ताच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. प्राजक्ताने नुकतेच लग्न केले आहे. 
प्राजक्ता हनमघरने धुमधडाक्यात लग्न न करता साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने नुकतेच रजत धळे सोबत लग्न केले. रजत एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे. त्याचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाहीये. तो मुळचा बारशीचा असून त्याचे शिक्षण पुण्यात झाले आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित कंपनीत तो सध्या नोकरी करत आहे. १४ ऑगस्टला अतिशय साधेपणाने आणि अगदी जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित प्राजक्ता आणि रजतने लग्न केले. 
प्राजक्तानेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. तिने रजतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ता आणि रजत खूपच खूश असल्याचे आपल्याला या फोटोत पाहायला मिळत आहेत.
प्राजक्ताने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिचे चाहते कमेंटद्वारे तिचे अभिनंदन करत आहेत. प्राजक्ताने पोस्ट केलेला हा फोटो आतापर्यंत हजारहून अधिक लोकांना लाइक केला आहे. प्राजक्ता या फोटोत भारतीय पेहरावात दिसत असून साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

Also Read : GST चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: Prajakta Hanamghar stuck in a marriage ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.