मुक्ता बनली पीएसआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 10:28 IST2016-05-17T04:55:56+5:302016-05-17T10:28:25+5:30

जोगवा, पुणे मुंबई पुणे, डबलसीट  या सुपरहीट चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सुंदर अभिनेत्री मुक्ता बर्वे ही ...

Powered by Blogger | मुक्ता बनली पीएसआय

मुक्ता बनली पीएसआय

गवा, पुणे मुंबई पुणे, डबलसीट  या सुपरहीट चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सुंदर अभिनेत्री मुक्ता बर्वे ही आता, पीएसआय बनली आहे. गोंधळून जाऊ नका. तर मुक्ता ही गणवेश चित्रपटात पीएसआयच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तशी मुक्ता नेहमीच तिच्या बिनधास्त व डॅशिंग स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे गणवेश या चित्रपटाच्या निमित्ताने तिला आपल्या स्वभावाला मिळतीजुळती भूमिका करण्यास मिळणार आहे. ती या चित्रपटात पोलिस सब इन्सपेक्टर मिरा पाटील या भूमिकेत डॅशिंग अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विजयाते एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत आणि अतुल जगदाळे दिग्दर्शित गणवेश या चित्रपटाची कथा आहे. वीटभट्टीवर काम करणाºया एका जोडप्याच्या मुलावर आधारित हा चित्रपट आहे. त्या मुलाची १५ आॅगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य या विषयावर भाषण करण्यासाठी निवड होते. पण त्यासाठी शाळेचा गणवेशाची गरज असते आणि या गणवेशासाठी त्या मुलाची आणि त्याच्या आई-वडिलांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. याव्यिरिक्त या चित्रपटात किशोर कदम, मुक्ता बर्वे, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर, बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांचा देखील समावेश आहे. हा चित्रपट २४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Powered by Blogger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.