पोस्टर गर्लचा रॅम्प वॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:17 IST2016-02-19T04:17:40+5:302016-02-18T21:17:40+5:30

कॅटरीना, ऐश्वर्या, प्रियंका, सोनाक्षी, जॅकलीन या सर्व ग्लॉमरस बी टाऊन गर्ल्स ला  मोठया ब्रॅण्ड साठी रॅम्पवर स्वत:चे जलवे दाखविताना ...

Poster Girl's Rump Walk | पोस्टर गर्लचा रॅम्प वॉक

पोस्टर गर्लचा रॅम्प वॉक

टरीना, ऐश्वर्या, प्रियंका, सोनाक्षी, जॅकलीन या सर्व ग्लॉमरस बी टाऊन गर्ल्स ला  मोठया ब्रॅण्ड साठी रॅम्पवर स्वत:चे जलवे दाखविताना प्रेक्षकांनी पाहिले आहेत.अशाच पद्धतीने मराठी अभिनेत्रीचे देखील स्वप्न असते की, एकदा तरी मोठ्या ब्रॅण्ड साठी रॅम्प वॉक करायचे. नेमकी हेच स्वप्न पूर्ण झाले आहे मराठी इंडस्ट्रीची पोस्टर गर्ल म्हणजेच सोनाली कुलकर्णीचे. मेकिंग इंडियाच्या एका इव्हेंट मध्ये तिने निता लूला या फेमस डिझायनरने डिझायन केलेला इथनिक ड्रेस परिधान केला होता. तसेच ती  या फॅशन शोची शोज टॉपरदेखील होती. तिने मराठमोळ््या अंदाजामध्ये पैठणी पासून बनलेला लाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता.व नाकात मोत्यांची नथ घातली होती. अशा संूदर मराठमोळ््या अप्सराने रॅम्प वॉक करून सर्वच प्रेक्षकांची मन जिंकली असतील हे नक्कीच. 

Web Title: Poster Girl's Rump Walk