स्वअस्तित्वाचा सकारात्मक शोध म्हणजे ‘वायझेड’गिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 23:19 IST2016-07-28T17:46:58+5:302016-07-28T23:19:09+5:30
आपल्या प्रत्येकाचा एक मेकाद्वितीय आवाज असतो. परंतु इतरांच्या बोलण्याला अवाजवी महत्त्व देऊन आपण तो दाबून टाकतो. तो आपला आवाज, ...

स्वअस्तित्वाचा सकारात्मक शोध म्हणजे ‘वायझेड’गिरी
आ ल्या प्रत्येकाचा एक मेकाद्वितीय आवाज असतो. परंतु इतरांच्या बोलण्याला अवाजवी महत्त्व देऊन आपण तो दाबून टाकतो. तो आपला आवाज, ते खोलवर लपून बसलेले आपले खरे व्हर्जन बाहेर काढण्याची हिंमत जे लोक दाखवतात, त्यासाठी जी धमक लागते ती म्हणजे ‘वायझेड’गिरी, असे पटकथा लेखक क्षितीज पटवर्धनने आगामी ‘वायझेड’ चित्रपटाविषयी बोलताना पत्रपरिषदेमध्ये सांगितले.
यावेळी सई ताम्हणकर, सागर देशमुख, अक्षय टांकसाळे आणि पर्ण पेठे अशी स्टारकास्ट उपस्थित होती. मुक्ता बर्वेदेखील फिल्ममध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
‘टाईम प्लीज’, ‘डबलसीट’ या सिनेमांनंतर क्षितीज पटवर्धन आणि समीर विद्वांस ही लेखक-दिग्दर्शक द्वयी ‘वायझेड’ चित्रपटातून महानगरीय गोंगाटात स्वत:चा हरवलेला आवाज शोधू पाहणाऱ्या पात्रांची कहाणी ‘स्क्रूबॉल कॉमेडी’ अंदाजता सादर करणार आहे. चित्रपटातील अबब, बत्तीस, पर्णरेखा, अंतरा या पात्रांच्या रोजच्या जगण्यातील प्रसंगातून, आॅकवर्डनेसमधून निर्माण झालेला विनोद प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे सई म्हणाली.
प्रमुख भूमिकेतील सागर म्हणाला की, तरुण म्हणन्या इतका लहान नाही आणि वयस्कर म्हणन्या इतपत मोठाही नाही अशा गोंधळात टाकणाऱ्या वयाच्या टप्प्यावर आलेल्या प्राध्यापकाची मी भूमिका साकारतोय. मी नेमका कोण? माझं खरं रूप काय? या प्रश्नांची उत्तर शोधताना माझ्या आयुष्यात येणारे विविध लोक आणि त्यांची धमाल म्हणजे हा चित्रपट.
ऋषीकेश-जसराज-सौरभ यांनी पहिलंवहिलं पूर्णपण संस्कृत प्रेमगीत चित्रपटासाठी तयार केले आहे. ‘ओ काका’सारख्या डान्स नंबरच्या तडक्या बरोबरच तुकरामांच्या अभंगाची गोडीदेखील ‘वायझेड’मधून चाखता येणार आहे. खुसखुशीत संवाद, सहजसुंदर अभिनय, उत्तम संगीत आणि प्रत्येकाला भिडणाऱ्या कथानकामुळे येत्या १२ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘वायझेड’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास उपस्थित स्टारकास्टने व्यक्त केला.
वायझेड अॅवॉर्डस्
आपल्या आयुष्यात ‘वायझेड’गिरी करणाऱ्या अबालवृद्धांचा सत्कार करण्यासाठी येत्या १ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये ‘वायझेड अवॉर्डस्’ आयोजन केले जाणार असून येथून पुढे दरवर्षी हा पुरस्कार देणार असल्याची माहिती क्षितीज पटवर्धनने दिली. आपल्या स्वप्नांसाठी झपाटून काम करणारे खरे हीरो या पुरस्कारास पात्र आहेत.