मिताली मयेकरच्या संसाराला ३ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:10 IST2024-01-25T12:07:28+5:302024-01-25T12:10:44+5:30

. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीने रोमँटिक पोस्ट शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Popular Marathi couple Siddharth Chandekar Mitali Mayekar is celebrating 3rd wedding anniversary Share Liplock Video | मिताली मयेकरच्या संसाराला ३ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

मिताली मयेकरच्या संसाराला ३ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व मितालीने २०२१ साली लग्न केले. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आज त्यांच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मितालीने रोमँटिक पोस्ट शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मितालीनं लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट केली. यात मिताली आणि सिद्धार्थ लिपलॉक किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. मितालीनं कॅप्शनमध्ये लिहलं, शांतता ही प्रेमाची एक भाषा आहे. ज्यांना प्रेम आहे त्यांना ती जाणवते आणि मी कृतज्ञ आहे की आम्ही तेवढे भाग्यवान आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एकत्र राहत आपण ७ वर्ष पुर्ण केली आहेत. तू आहेस म्हणून मी आहे. जसजसे आपलं वय उलटतं जाईल, तसतसे हे जंगल आपल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी कायम आपल्यासोबत राहो'.

मिताली आणि सिद्धार्थ या रोमँटिक व्हिडीओवर सध्या सिनेविश्वातील कलाकार आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सिद्धार्थ आणि मितालीने पुण्याच्या ढेपेवाड्यात २०२१ मध्ये लग्न केले होते. मितालीला प्रेमाने Tiny असं सिद्धार्थ म्हणतो. तर कुंफू पांडा सिनेमातील पांडाप्रमाणे सिद्धार्थ आहे, असं मितालीला वाटतं, त्यामुळे त्याला ती Panda म्हणते. टिनी पांडाची ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते. दोघांचे व्हिडीओ ट्रेंड होत असतात.

सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतेच त्याचे झिम्मा २ आणि ओले आले हे चित्रपट रिलीज झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर लवकरच तो श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहे. तर मिताली मयेकर शेवटची लाडाची लेक मालिकेत पाहायला मिळाली होती. 

Web Title: Popular Marathi couple Siddharth Chandekar Mitali Mayekar is celebrating 3rd wedding anniversary Share Liplock Video