बाबू, शोना नाही! पूजा सावंतला 'या' टोपणनावाने हाक मारतो तिचा नवरा, शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:34 IST2025-01-26T12:16:14+5:302025-01-26T12:34:52+5:30
पूजाच्या पतीनं तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

बाबू, शोना नाही! पूजा सावंतला 'या' टोपणनावाने हाक मारतो तिचा नवरा, शेअर केली खास पोस्ट
Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजाने अभिनयाबरोबरचं आपल्या नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे. पूजा सावंत गेल्यावर्षी २८ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. तिने सिद्धेश चव्हाणशी (Siddesh Chavan) लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या पूजा वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा पती कामानिमित्ताने ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे पूजा कधी ऑस्ट्रेलिया तर कधी मुंबईत असते. नुकतंच पूजाच्या पतीनं तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
काल पुजाचा वाढदिवस होता. तर तिच्या या खास दिवशी तिच्या नवऱ्यानं खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. सिद्धेशने पूजासोबतचा एक खास फोटो पोस्ट केला. या फोटोला कॅप्शन देत त्यानं लिहलं, "तुझ्या तेजस्वी हास्याने जसे माझे जीवन उजळते, तसंच ते हास्य जगाला उजळत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा, बोजू!". या पोस्टवरुन स्पष्ट झालं की पूजाला तिचा नवरा लाडाने 'बोजू' या नावाने (Nickname) हाक मारतो.
पुजा सध्या ऑस्ट्रेलियात असली तरीही तिचे भारतात अजूनही तितकेच चाहते आहेत. त्यामुळे ती सतत तिचे नवनवे फोटो शेअर करून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहते. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'मुसाफिरा' या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. पूजा "क्रॅक' चित्रपटातील एका गाण्यात विद्युत जामवालबरोबर डान्स करताना दिसली होती. आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता आहे.