पिंडदान टीमची लोकमतला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:08 IST2016-06-16T07:38:29+5:302016-06-16T13:08:29+5:30

   सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे प्रस्तुत पिंडदान या चित्रपटाच्या टीमने नुकतेच लोकमत आॅफीस भेट दिली. यावेळी चित्रपटाच्या अनेक गोष्टी पिंडदान ...

Pindand team visit Lokmat | पिंडदान टीमची लोकमतला भेट

पिंडदान टीमची लोकमतला भेट

  
 सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे प्रस्तुत पिंडदान या चित्रपटाच्या टीमने नुकतेच लोकमत आॅफीस भेट दिली. यावेळी चित्रपटाच्या अनेक गोष्टी पिंडदान या चित्रपटाच्या टीमने लोकमतसोबत शेअर केल्या आहेत. तसेच विदेशी अभिनेत्रीनेदेखील आपला मराठी बाणा दाखवत या भेटीला चार चॉंद लावले. या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रशांत पाटील म्हणाले, या चित्रपटाच्या नावावरून हा काहीसा पारंपारिक चित्रपट असेल हा समज आहे. तो चुकीचा आहे. कारण पिंडदान या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट नसून या प्रथेविषयीच्या भावभावनादेखील टच करण्यात आला नाही. तर ही एक पिंडदान या विषयाच्या अवतीभोवती फिरणारी रहस्यमय कथा आहे. अविनाश घोडके यांनी ही कथा लिहीली आहे.
    दोन वेगवेगळे जग,संस्कृती हे एकमेकांना कसे भेटतात ते या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि एक रहस्यमय प्रेमकहानीचा ट्रॅगल तुम्हाला अनुभवता येणार आहे. तसेच या चित्रपटातील गाणी देखील खूप छान असल्याचे अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने याने सांगितले. तर अभिनेत्री मनवा नाईक म्हणाली, या चित्रपटात मी कॅमेरामनची भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरचं खूप छान होता. एक तर  आपल्याकडे  कॅमेरा करणाºया मुलींची संख्या कमी आहे. त्यामध्ये मला कॅमेरा करण्याची भूमिका मिळणं ही खरचं खूप छान गोष्ट आहे. तसेच बिनधास्त असणारी ही कॅमेरामन तुम्हाला हटक्या भूमिकेत दिसणार आहे. 

चौकट: पिंडदान हा चित्रपटाच्या माध्यमातून सत्यमय घटनेवर आधारित एक रहस्यमय कथा प्रेक्षकांना १७ जूनला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट गोवा फेस्टीवलमध्ये हाऊसफुल झाला होता, त्यामुळे साहिजच प्रेक्षकांना उत्सुकता लागली असणार हे नक्की.  
                                पूनम शेंडे (पिंडदान निर्माते, सारथी एंटरटेन्मेंट)

Web Title: Pindand team visit Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.