तस्वीर बहोत कुछ बोलती है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 15:31 IST2016-11-01T13:57:55+5:302016-11-29T15:31:37+5:30

          प्रत्येकाच्या फोटोमध्ये त्यांच्या काहीना काही आठवणी या दडलेल्या असतात. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कायमचे ...

The picture speaks a lot ... | तस्वीर बहोत कुछ बोलती है...

तस्वीर बहोत कुछ बोलती है...

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
        प्रत्येकाच्या फोटोमध्ये त्यांच्या काहीना काही आठवणी या दडलेल्या असतात. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कायमचे बंदिस्त करण्यासाठी आपण फोटो काढतो. आणि आपल्या सुवर्ण क्षणांना कायमचे कैद करतो. कलाकारांचे तर मग काही विचारुच नका, सतत कॅमेºयाच्या झगमगाटात वावरणारे हे सेलिब्रिटी त्यांचे अनेक महत्वाचे क्षण कॅमेºयात कॅप्चर करतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री जेनेलिया देशमुखने सोशल साईट्सवर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. आता तुम्ही म्हणाल फोटो तर सगळेच अपलोड करतात यात काय नवल. तर त्याचे झाले असे की, जेनेलियाने जो फोटो सोशल साईट्सवर शेअर केला आहे तो. एकदमच खास आहे. हा देशमुख परिवाराचा कौंटूंबिक फोटो आहे. या फोटामध्ये तुम्हाला रितेश, जेनेलिया, रितेशची आई आणि त्याची दोन्ही मुले रिआन व राहिल दिसतील. एवढेच नाही तर या फोटोमध्ये रितेशचे बाबा म्हणजेच विलासराव देशमुख देखील आहेत. वाटलेना आश्चर्य पण हो या फॅमिलि फोटोमध्ये विलासरावांची छबी देखील पाहायला मिळते. हा फोटो विलासरावांच्या फोटो समोर थांबुन सगळ््यांनी काढला आहे. त्यामुळे या फोटोमध्ये विलासराव देशमुखच आहेत कि काय असा एका क्षणाला भास होतो. खरतर ही फोटो काढणाºयाचीच कमाल आहे असे म्हणावे लागेल. पण ते काहीही असले तरी जेनेलियाने मात्र दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे. हा फोटो पाहुन असेच वाटते कि, हर तस्वीर कुछ बोलती हे...     

Web Title: The picture speaks a lot ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.