फुलराणीची पन्नाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 13:52 IST2016-07-15T08:22:58+5:302016-07-15T13:52:58+5:30

            मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाटकांनी आपले खास स्थान तयार केले आहे. मराठी रसिकांच्या पाठिंब्याने आजवर अनेक ...

Phulrani's Fifty | फुलराणीची पन्नाशी

फुलराणीची पन्नाशी


/>

            मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाटकांनी आपले खास स्थान तयार केले आहे. मराठी रसिकांच्या पाठिंब्याने आजवर अनेक नाटकं अजरामर झालेली आहेत. पु.ल च्या सिद्धहस्तलेखणीतून साकारलेलं नाटक म्हणजे 'ती फुलराणी'. पुलंच्या ती फुलराणीतील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, अशावेळी 'ती फुलराणी' हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊनयेण्याचं शिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं हेमांगी कवीच्या रूपाने नवी फुलराणी रंगभूमीला गवसली आणि  अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने पन्नासाव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. या नाटकासाठी हेमांगी कवीला नुकताच झी टॉकीजचासर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
 
येत्या रविवारी १७ जुलैला दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिरला 'ती फुलराणी' च्या पन्नासाव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगणार आहे. रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या 'ती फुलराणी' च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा सुवर्णमहोत्सवी प्रयोग खरोखरच अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण उर्जा असलेल्या या फुलराणी' चा बहर उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित.
 
cnxoldfiles/span> सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे, अंजली मायदेव,मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळेहे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.

Web Title: Phulrani's Fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.