चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने केले या अभिनेत्रीचे फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 17:16 IST2017-05-16T11:46:26+5:302017-05-16T17:16:26+5:30

मराठी कलाकार त्यांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. आपल्या अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता ...

Photoshoot of the actress acted with Chinmay Mandlekar's wife | चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने केले या अभिनेत्रीचे फोटोशूट

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने केले या अभिनेत्रीचे फोटोशूट

ाठी कलाकार त्यांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. आपल्या अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांची चर्चा तर कायम होतच असते. मात्र आता चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसह त्यांचे जोडीदारसुद्धा आपापल्या कामानं प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. आपल्या जोडीदारापेक्षा काही तरी वेगळे आणि हटके करुन स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकरनं असाच काहीसा प्रयत्न केलाय. तिने एक खास फोटोशूट केलं आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेहानं चक्क चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचं फोटोशूट केलं आहे. नेहाने विविध अभिनेत्रींना आपल्या कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद केले आहे. यांत अभिनेत्री नेहा जोशीच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोशूटमध्ये नेहा जोशीच्या विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा अंदाज ग्लॅमरस आहे. नेहाने टिपलेली नेहा जोशीची प्रत्येक छबी विशेष आणि हटके आहे. नेहा जोशीच्या या फोटोशूटचे जोरदार चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत आणि रसिकांमध्ये रंगल्या आहेत. नेहा मांडलेकर यांच्या क्रिएटिव्हीला विशेष दाद दिली जाते आहे. शिवाय त्यावर कौतुकाच्या कमेंटचा वर्षावही होतोय. नेहा मांडलेकर यांनी फोटोशूट केलेल्या अभिनेत्री नेहा जोशीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मराठी-हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये नेहा जोशीनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे, पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या. 






Web Title: Photoshoot of the actress acted with Chinmay Mandlekar's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.