हा फोटो होत आहे सोशलमीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 15:09 IST2017-02-24T09:39:43+5:302017-02-24T15:09:43+5:30
एखादा फोटो अपलोड व्हावा आणि त्या फोटोची चर्चा काही वेळेतच रंगावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोशलमीडिया. असाच एक फोटो ...
.jpg)
हा फोटो होत आहे सोशलमीडियावर व्हायरल
खादा फोटो अपलोड व्हावा आणि त्या फोटोची चर्चा काही वेळेतच रंगावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोशलमीडिया. असाच एक फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे अभिनेत्री मनवा नाईक, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू या कलाकारांचा. प्रेक्षकांच्या या तीन लाडक्या कलाकारांच्या फोटो सध्या सोशलमीडियवर खूपच चर्चा होत असल्याचे दिसत आहे. कारण हा फोटो पाहून प्रेक्षकांना ही आश्चर्य वाटेल यात शंका नाही. कारण या फोटोमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांना वाटा फुटल्या आहेत. हे तिघे भविष्यात एकत्रित दिसणार का असा प्रश्न उपस्थित राहिला असेल तर ही शंका आताच दूर करा. कारण हा फोटो एका पुरस्कार सोहळयादरम्यानचा आहे. या दोघांना पाहून अभिनेत्री मनवा नाईक हिलादेखील फोटो काढण्याचा आवरला नाही. तिने नुकतेच सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू यांच्यासोबतचा हा फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर सैराट स्टार म्हणत तिने पोस्टदेखील लिहीली आहे. त्याचबरोबर या नवोदित कलाकारांसोबत फोटो काढून मनवाने एक आदर्शच समोर ठेवला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. मनवाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत क्षणभर विश्रांती, नो एंट्री पुढे धोका आहे, पोरबाजार, शासन, पिंडदान, जाऊ दया ना बाळासाहेब असे अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर तिने हिंदी मालिकेच्या माध्यमातूनदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
![]()