फुलवा खामकर रमली जुन्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 13:18 IST2017-01-05T13:14:16+5:302017-01-05T13:18:26+5:30
प्रत्येकजण भूतकाळातील चांगल्या आणि वाईट आठवणी घेऊन पुढे पाउल टाकत असतो. त्याच्या आ़युष्यातील या भूतकाळातील आठवणी साक्षीदार असतात. अशाच ...

फुलवा खामकर रमली जुन्या आठवणीत
प रत्येकजण भूतकाळातील चांगल्या आणि वाईट आठवणी घेऊन पुढे पाउल टाकत असतो. त्याच्या आ़युष्यातील या भूतकाळातील आठवणी साक्षीदार असतात. अशाच काही भूतकाळातील आठवणीत प्रेक्षकांची लाडकी कोरिओग्राफर फुलवा खामकर रमली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच फुलवाने सोशलमीडियावर एक पोस्ट अपलोड केली आहे. ती आपल्या या पोस्टच्यामाध्यमातून सांगते, आपल्या भूतकाळापासून काही गोष्टींमुळे आजपर्यंत पळत होते मी....कारणं अनेक होती....भूतकाळातील काही आठवणी नकोशा वाटायच्या.....म्हणून,वर्तमानात घडणारया घटनांमधे स्वत:ला विसरत होते मी....बाहय गोष्टींवर भाळून जाणं हा मनुष्यधमार्चा एक भागच आहे म्हणा....तो इमानेइतबारे पाळत होते मी!आणि मग कधीतरी जाणीव होते स्वत:च्या असण्याची म्हणजे आपल्याला मिळालेल्या वारशाची....आज एवढे वर्ष हात न लावलेला माझा वारसा खरंतर मला मिळालेला खजिना मी शेवटी धाडस करून चाळीस वर्षांनीच का होईना उघडते....आणि आज तो पहाताना,त्याच्या खोलात शिरताना जाणवतं की जगातील अत्यंत श्रीमंत स्त्री आहे मी.....बाबांचे जुने लेख,बाबांच्या जुन्या मुलाखती वाचताना मला स्वत:बद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात.....भरकटत जाणारया मला एक दिशा मिळायला लागते.....आणि इतक्या वर्षांमध्ये जाणवलेली स्वत:मधील एक पोकळी आपोआप भरून यायला लागते. फुलवाची ही पोस्ट पाहता, तिच्या चाहत्यांच्या डोळयात पाणी भरून आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या या पोस्टला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच ग्रेट ताई म्हणत तिला सोशलमीडियावर कमेंन्टदेखील मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे. फुलवाने यापूर्वी मराठी इंडस्टीमध्ये नटरंग, मितवा, सांगतो ऐका, क्लासमेट, पोस्टर गर्ल, फोटोग्राफी अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे.