‘अॅट्रॅासिटी’ तून होणार समाजातील वास्तवतेचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:53 IST2018-02-17T11:23:42+5:302018-02-17T16:53:42+5:30

प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जात, वेगळं करण्याचं धाडस करतात तेच गगनभरारी घेत लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात हा नियम सिनेसृष्टीतही ...

The philosophy of realities in society will be achieved through 'introspect' | ‘अॅट्रॅासिटी’ तून होणार समाजातील वास्तवतेचे दर्शन

‘अॅट्रॅासिटी’ तून होणार समाजातील वास्तवतेचे दर्शन

रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जात, वेगळं करण्याचं धाडस करतात तेच गगनभरारी घेत लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात हा
नियम सिनेसृष्टीतही लागू पडतो. त्यामुळेच काही निर्माते व दिग्दर्शक तद्दन टाइमपास सिनेमे बनवण्याऐवजी
मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिनेमांना पसंती देतात. निर्माते डॅा. राजेंद्र पडोळे व दिग्दर्शक दिपक कदम यांनीही
‘अॅट्रॅासिटी’ या आगामी मराठी सिनेमात वर्तमानकाळातील ज्वलंत विषय हाताळत, सर्वार्थाने मनोरंजन करणारा चित्रपट
बनवला आहे. आर. पी. प्रोडक्शनची निर्मिती असणारा हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या या कलाकृतीबद्दल बोलताना राजेंद्र पडोळे सांगतात कि, सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्याचा
उपयोग सामाजिक जाणीवा जपण्यासाठीही केला जाऊ शकतो. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींकडे लक्ष वेधून घेतला
जाऊ शकतो. ‘अॅट्रॅासिटी’ या चित्रपटात आमच्या टिमने हेच काम केलं आहे. ‘अॅट्रॅासिटी’ नावाचा कायदा असल्याचं सर्वांनाच
ठाऊक आहे, पण त्याचा फायदा कोण घेतंय? ज्यांच्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलाय त्यांना याचा लाभ मिळतोय
का? या आणि यांसारख्या बऱ्याच प्रश्नांवर आज कोणीही चर्चा करताना दिसत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने
‘अॅट्रॅासिटी’बाबत चर्चा सुरू होऊन जनजागृती होण्यास मदत होईल याची खात्री ही पडोळे यांना वाटते.
‘अॅट्रॅासिटी’ म्हणजे केवळ मनोरंजन नसून समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं
दिग्दर्शक दिपक कदम सांगतात. मी आजवर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चित्रपटांनाच प्राधान्य दिले आहे. ‘अॅट्रॅासिटी’
हा माझा १८ वा चित्रपट आहे. ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचं केवळ नावच अनेकांना माहिती आहे.पण त्यात नेमकं काय आहे हे
फार कमी लोकांना माहिती आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने या विषयी जागरूकता निर्माण होईल अशी आशा दिपक कदम
यांना आहे.

ऋषभ पडोळे आणि पूजा जैस्वाल ही नवी कोरी जोडी ‘अॅट्रॅासिटी’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. या दोघांच्या साथीला निखिल
चव्हाण, यतिन कार्येकर, गणेश यादव, विजय कदम, निशिगंधा वाड, लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. कमलेश सुर्वे, राजू मोरे,
ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. राजेश सोमनाथ यांनी छायांकन केलं आहे, तर
मधु कांबळे यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. संगीतकार अमर राम-लक्ष्मण यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.
२३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॅासिटी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The philosophy of realities in society will be achieved through 'introspect'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.