परफेक्शनिस्ट स्वप्निल आणि सचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 22:35 IST2016-02-20T05:32:57+5:302016-02-19T22:35:07+5:30
बॉलीवुडमध्ये आमीर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते हे तर सर्वांनाच माहित आहे. आमीर ...

परफेक्शनिस्ट स्वप्निल आणि सचित
बॉलीवुडमध्ये आमीर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते हे तर सर्वांनाच माहित आहे. आमीर त्याचे प्रत्येक शॉर्ट कम्लिट झाल्यावर ते स्वत: जाऊन चेक करतो. जोपर्यंत शॉर्ट परफेक्ट होत नाही तोपर्यंत टेक वर टेक रिटेक होतच असतात. आमीरच्या कामातील या परफेक्टपणासाठी त्याला मि.परफेक्शनिस्ट हा टॅग मिळाला. पण आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीटही मिस्टर परफेक्शनिस्ट आहेत आणि आश्चर्य म्हणजे एक नाही तर दोघे आहेत.
आता मराठीतील मिस्टर परफेक्शनिस्ट कोण आणि तेही दोघे असा प्रश्न तर पडलाच असेल ना. तर ती परफेक्शनिस्ट जोडी आहे स्वप्निल जोशी आणि सचित पाटील यांची. आता असे काय झाले कि यांना हा टॅग लावलाय. तर ते दोघेही त्यांच्या एका चित्रपटाच्या सेटवर आपला शॉर्ट परफेक्ट झालाय कि नाही हे अगदी अभ्यासपुर्वक पाहत होते. आपला शॉर्ट पाहण्यात दोघेही अक्षरश: हरवून गेल्याचे दिसत होते.