'पप्पी दे पारु'चा किलर अंदाज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 16:21 IST2016-09-27T06:39:28+5:302016-09-27T16:21:49+5:30
'पप्पी दे पारुला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा एक हॉट आणि नवा अंदाज समोर आलाय. पप्पी दे पारुला या म्युझिक ...

'पप्पी दे पारु'चा किलर अंदाज !
'पप्पी दे पारुला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा एक हॉट आणि नवा अंदाज समोर आलाय. पप्पी दे पारुला या म्युझिक व्हिडीओमध्ये बिकीनीमुळे चर्चेत आलेल्या स्मिताचा हा नवा अवतार कुणालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.
नुकतंच स्मितानं एक फोटोशूट केलंय. प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर याने हे फोटोशूट केलंय. या फोटोमध्ये स्मिता स्विमींग सूटमध्ये पाहायला मिळतेय. लाल रंगाच्या स्विम सूटमध्ये स्मिताचा अंदाज सेक्सी आणि हॉट असल्याचं दिसतंय.
याशिवाय स्मिताच्या निरनिराळ्या दिलखेचक आणि मादक अदा तेजसनं आपल्या कॅमे-यात कैद केल्यात. बालपणापासूनच आपली टॉमबॉय इमेज असून घरीही कधी कुटुंबाने माझ्यावर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी बंधन लादली नाहीत असं स्मितानं सीएनएक्स लोकमतशी बोलताना सांगितलंय. त्यामुळं काही तरी वेगळं करण्याच्या उद्देशाने हे फोटोशूट केल्याचंही स्मितानं आवर्जून सांगितलं. स्मिताचा हा अंदाज रसिकांनाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.