Video: 'पछाडलेला' सिनेमातील भुताटकी वाडा नेमका कुठे आहे? पाहाण्यासाठी आजही होते गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:55 IST2025-06-04T13:55:15+5:302025-06-04T13:55:35+5:30

'पछाडलेला' सिनेमातील सर्वात लक्षवेधी ठिकाण म्हणजे तो भयावह वाडा आजही जशाचा तसा आहे.

Pachadlela Movie Inamdar Wada Pant Amatya Bawadekar Wada Located In Gaganbawda Kolhapur Video Viral | Video: 'पछाडलेला' सिनेमातील भुताटकी वाडा नेमका कुठे आहे? पाहाण्यासाठी आजही होते गर्दी!

Video: 'पछाडलेला' सिनेमातील भुताटकी वाडा नेमका कुठे आहे? पाहाण्यासाठी आजही होते गर्दी!

Pachadlela Movie: 'पछाडलेला' हा मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. महेश कोठारे दिग्दर्शित हॉरर कॉमेडी असलेला हा सिनेमा २००४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील अनेक कॅरेक्टर लोकप्रिय झाली होती. 'सूड दुर्गे सूड', 'बाबा लगीन' आणि 'डोळे बघ डोळे बघ' हे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.  भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, विजय चव्हाण, मेघा घाडगे, नीलम शिर्के अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात होती. या चित्रपटाचं कथानक इनामदार वाड्याभोवती फिरतं. पण, हा भुताटकी वाडा नेमका आहे तरी कुठे? हे जाणून घेऊयात.  

'पछाडलेला' सिनेमातील हा गूढ वाडा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात आहे. 'पंत अमात्य बावडेकर वाडा' असं या वाड्याचं नाव आहे.  या वाड्यात अनेक सिनेमांचं शूटींग झालंय. चारी बाजूंनी निसर्ग असलेल्या ठिकाणी हा वाडा बांधण्यात आलेला आहे. या वाड्याला आजही पर्यटक आणि सिनेप्रेमी खास भेट देतात.  'पछाडलेला' चित्रपटानंतर तो एक पर्यटन स्थळ बनलेला आहे. या वाड्याचा व्हिडीओ Gaganbawdyacha..Creator या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.


माहितीनुसार,  शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान रामचंद्रपंत अमात्य यांचे नववे वंशज परशुरामपंत अमात्य यांनी १९३३ ते १९३५ या काळात हा वाडा बांधला. या वाड्याच्या पहिल्याच खोलीत प्रवेश केल्यावर सर्व इतिहास लिहिण्यात आलेला आहे. याठिकाणी संपूर्ण संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. कोल्हापूरपासून हा वाडा ४६ किलोमीटर अंतरावर आहे. आज या वाड्याला कित्तेक वर्षे होऊनही ही वास्तू जशास तशी आहे.

 

Web Title: Pachadlela Movie Inamdar Wada Pant Amatya Bawadekar Wada Located In Gaganbawda Kolhapur Video Viral