शासकीय विश्रामगृहातून गिरीश ओक यांचे सामान बाहेर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:50 IST2017-02-02T06:17:37+5:302017-02-02T11:50:35+5:30

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारे अभिनेते गिरीश ओक यांचा सिंधुदुर्ग येथे घोर अपमान करण्यात आला आहे. हो, तुझे ...

Out of Girish Oak's baggage out of the government guest house | शासकीय विश्रामगृहातून गिरीश ओक यांचे सामान बाहेर फेकलं

शासकीय विश्रामगृहातून गिरीश ओक यांचे सामान बाहेर फेकलं

ल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारे अभिनेते गिरीश ओक यांचा सिंधुदुर्ग येथे घोर अपमान करण्यात आला आहे. हो, तुझे आहे तुजपाशी या आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी ते सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये दाखल झाले होते. यावेळी राहाण्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय त्यांनी निवडला होता. रात्री नियोजित प्रयोगासाठी ते बाहेर निघून गेले. प्रयोग संपल्यानंतर रात्री ते विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आलेलं दिसलं.

              यासंदर्भात त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाºयांना विनापरवानगी सामान बाहेर फेकण्याविषयी विषयी विचारले असता, त्यांनी जिल्ह्याच्या सीईओंच्या नातेवाईकांना रुम हवी असल्यानं तुमचं सामान बाहेर काढण्यात आले असल्याचे   त्या शासकीय कर्मचाºयाने सांगितलं. यावेळी इतक्या रात्री आम्ही कुठे जायचं या गिरीश ओक यांच्या प्रश्नावर कर्मचाºयांनी हतबलता व्यक्त केली. तुम्ही एका दिवसासाठी येणार मात्र आम्हाला अधिकाºयांना कायम उत्तर द्यावं लागतं असं सांगण्यात आले.

              या साºया प्रकारानंतर गिरीश ओक यांनी मिळालेल्या वागणुकीवर एक व्हिडीओ जारी केला आहे. यात त्यांनी शासकीय विश्रामगृहावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सोशलमीडियावर अनेक मराठी कलाकारांनी गिरीश ओक यांच्या अपमानाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक रवी जाधव, आरोह वेलणकर यांनी सोशलमीडियावर जिल्ह्याच्या सीईओविषयीच जाहीर निषेध व्यक्त केला आहे. गिरीश ओक यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट दिले आहेत. त्यांनी पसंत आहे मुलगी, जुळून येथील रेशीमगाठी, हया गोजिरवाण्या घरात, या सुखानों या अशा अनेक लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. 



 

Web Title: Out of Girish Oak's baggage out of the government guest house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.