'हे राम नथुराम' या नाटकाला कोकणातही विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 13:29 IST2017-01-12T13:29:06+5:302017-01-12T13:29:06+5:30
अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे. 'हे राम नथुराम' ...
.jpg)
'हे राम नथुराम' या नाटकाला कोकणातही विरोध
अ िनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे. 'हे राम नथुराम' या नाटकाचे कोकणात प्रयोग कराल तर विचार करुन करा, अशी धमकी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी दिल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केलाय. शरद पोंक्षे सध्या या नाटकाच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या नाटकाची तिकीट विक्री कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी थांबविण्यात आलीय. या धमकीनंतर शरद पोंक्षे यांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलीस संरक्षणात नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. सध्या मनमर्झिया या चित्रपटाच्या चित्रीकरणात शरद पोक्षें व्यस्त आहेत. तसेच त्यांचे काही आगामी मराठी चित्रपट देखील प्रदर्शनासाठी तयार आहेत. हे राम नथुराम या नाटकांच्या हिंदी प्रयोगासाठी देखील ते प्रयत्न करीत असल्याचे कळतेय. हे राम नथुराम हे नाटक लवकरच हिंदीमध्ये येमार असल्याचे त्यांनी लोकमत सीएनएक्शशी बोलताना सांगितले होते. या नाटकाचे दौरे संपूर्ण भारतभर करण्याचा शरद पोंक्षेंचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले होते. नाटक केवळ एका भाषेमध्ये आले तर त्याला बरीच बंधने येताता. जास्त लोकांपर्यंत ते पोहचत नाही. आणि म्हणुनच हे राम नथुराम प्रादेशिक भाषेत करुन ते सर्वांसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. या हिंदी मधील नाटकाचे लेखन देखील शरद पोंक्षेच करणार आहेत. परंतू महाराष्ट्रातच या नाटकाला अशआ प्रकारे विरोध होत असल्याचे पाहत आहोत. त्यामुळे हे नाटक हिंदी मध्ये करुन त्याचे संपूर्ण भारतात प्रयोग करण्याचे शरद पोंक्षेंचे स्वप्न सत्यात उतरेल का हे लवकरच समजेल.
![]()