OMG! लग्नाआधीच मराठीतील या प्रसिद्ध कपलचे रोमांस करतानाचे फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 13:13 IST2019-11-11T13:13:22+5:302019-11-11T13:13:42+5:30
मराठीतील या कपलने रोमांस करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

OMG! लग्नाआधीच मराठीतील या प्रसिद्ध कपलचे रोमांस करतानाचे फोटो झाले व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्यानं सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. या दोघांचा यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. त्याआधीपासून ते दोघं सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. नुकतेच सिद्धार्थनं रोमांस करतानाचे फोटो व त्याचे मितालीबाबतचे फिलिंग्स इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नुकतेच सिद्धार्थने मितालीसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. त्यांच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
सिद्धार्थ व मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहे. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. एक महिनाभर ते तिथे राहणार आहेत. सिद्धार्थनं याबाबत सांगितलं, की ‘हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रिप हा विषयही यात आहे. ऑस्ट्रेलियातला आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक चित्रपट ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ सारख्या मालिकेतून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थनं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थनं मितालीला प्रपोज केलं होतं. सिद्धार्थनं त्यावेळीही देखील मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.
आता मिताली व सिद्धार्थ लग्नबेडीत कधी अडकणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.