OMG ! प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 15:00 IST2017-02-19T09:30:00+5:302017-02-19T15:00:00+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. मात्र या सर्व आगामी चित्रपटामध्ये एक खासियत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

OMG! Prayer Behera and Bhushan Pradhan gathered | OMG ! प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान एकत्रित

OMG ! प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान एकत्रित

्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येऊ घालत आहेत. मात्र या सर्व आगामी चित्रपटामध्ये एक खासियत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ती म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीत येऊ घालणाºया चित्रपटांमध्ये अनोख्या जोडया पाहायला मिळणार आहेत. आता हेच पाहा ना, काही दिवसांपूर्वीच गश्मिर महाजनी आणि स्पृहा जोशी एकत्रित एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली. कधी ही जोडी एकत्रित पाहायला मिळेल असा विचारदेखील प्रेक्षकांनी केला नव्हता. मात्र हे सरप्राईज प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

         आता याच्यापाठोपाठ प्रेक्षकांना आणखी एक अनोखी जोडी एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ती जोडी म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान यांची. ही जोडी प्रेक्षकांना लवकरच एका आगामी चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असणार आहे. प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधान या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार एकमेकांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे.

           कारण दोघांनी ही एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर एका आगामी चित्रपटात एकत्रित झळकणार असल्याचेदेखील भूषणने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले. तसेच तिच्या हास्यावरदेखील या अभिनेत्याने लिहिले आहे. अशा पध्दतीने प्रेक्षकांना आता मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक हटके जोडी पाहायला मिळणार आहे. प्रार्थनाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकताच तिचा फुगे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाला प्रचंड प्रमाणात पसंती मिळाली असल्याचे पाहायला मिळाले. 




 

Web Title: OMG! Prayer Behera and Bhushan Pradhan gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.