OMG! गश्मिर महाजनी आणि स्पृहा जोशी एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:20 IST2017-02-13T06:50:16+5:302017-02-13T12:20:16+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येत आहेत. या चित्रपटांमध्ये विविध जोडया प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. मात्र यंदा प्रेक्षकांना एक वेगळीच ...
.jpg)
OMG! गश्मिर महाजनी आणि स्पृहा जोशी एकत्रित
म ाठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येत आहेत. या चित्रपटांमध्ये विविध जोडया प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. मात्र यंदा प्रेक्षकांना एक वेगळीच आणि हटके जोडी एकत्रित पाहायला मिळणार आहे. ही जोडी आहे, गश्मिर महाजनी आणि स्पृहा जोशीची. हो आश्चर्य वाटले ना, पण हो हे दोन्ही कलाकार लवकरच एका आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे अभिनेता गश्मिर महाजनी याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. गश्मिर महाजनी सांगतो, हो, स्पृहा जोशी आणि मी पहिल्यांदा एकत्रित काम करतो. कोणी विचार ही केला नसेल की, आम्ही दोघे एकत्रित काम करू. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून प्रेक्षकांना खूपच हे मनोरंजन वाटणार आहे. त्याचबरोबर माझ्यासाठीदेखील ही नावीन्य गोष्ट आहे. या चित्रपटात माझी आणि स्पृहाची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आजच या चित्रपटाचा पहिला दिवस आहे. या चित्रपटाचे चित्रिकरणाची सुरूवात कोकणापासून करत आहे.
समीर विध्वंस दिग्दर्शित हा आगामी चित्रपट आहे. या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने खूपच आनंदी आहे. मी आतापर्यत खूप दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. मात्र पहिल्यांदा माझ्या वयाच्या दिग्दर्शकासोबत काम करत आहे. त्यामुळे ती भिती नाही. मित्रासोबतच काम करत आहे असे वाटते. या चित्रपटाचे नाव अदयाप ही गुलदस्त्यात आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असे मला वाटते. गश्मीरने नेहमीच मराठी चित्रपटसृष्टील सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यामध्ये देऊळबंद, कान्हा अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच तो डोंगरी का राजा या बॉलिवुड चित्रपटातदेखील झळकला होता.