अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:45 IST2019-02-21T17:44:55+5:302019-02-21T17:45:18+5:30

रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

Oh my God! Candidates rush to see Archie's glimpse at the examination center | अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

अरे बापरे...! चक्क परीक्षा केंद्रावर आर्चीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

'सैराट' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत लोकप्रिय झाली. आजही ती आर्ची या नावाने ओळखली जाते. रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

तिची लोकप्रियता आणि तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. ती जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देत आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल हे ठाऊक असल्यामुळे कॉलेजच्या प्राचार्या जयश्री गवळी-सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती.


आर्चीच्या चाहत्यांमुळे इतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही प्राचार्यांची इच्छा होती. पोलीस बंदोबस्तामुळे इतर विद्यार्थ्यांना आर्चीच्या चाहत्यांचा कोणताही त्रास झाला नसल्याचे समजते आहे. आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. 

Web Title: Oh my God! Candidates rush to see Archie's glimpse at the examination center