नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने भारतीय सैनिकांना वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:31 IST2020-10-23T17:21:13+5:302020-10-23T18:31:25+5:30

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या आठव्या दिवशी Illustration फोटोच्या माध्यमातून सालामी दिली आहे.

On the occasion of navratri, tejaswini pandit tribute to indian soldiers | नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने भारतीय सैनिकांना वाहिली आदरांजली

नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने भारतीय सैनिकांना वाहिली आदरांजली

अवघ्या जगाला 2020मध्ये कोरोनाचा भयंकर आजार देणा-या चीनने गलवान खो-यात भारतीय सैनीकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने त्यानंतर चीनला चोख प्रतिउत्तर दिले. देशाच्या करोडो जनतेचे संरक्षण करणा-या ह्या भारतीय सैन्याला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या सातव्या दिवशी Illustration फोटोच्या माध्यमातून सालामी दिली आहे.

 तेजस्विनी पंडित म्हणते, “महासत्ता बनण्याची स्वप्न पडू लागलेल्या चीनने भारताला आगीतून फुफाट्यात लोटलं. आधीच कोरोनाच्या आगीत होरपळत होतो, त्यात ऐन लॉकडाऊनमध्ये भारतीय सैनिकांवर त्यांनी ज्यापध्दतीने हल्ला केला आणि त्यांना ज्याप्रकारे छळून मारलं. ते ऐकुन हृदय पिळवटून जाते. पण असे भ्याड हल्ले परतवायला समर्थ असलेल्या भारतीय सैन्यानेही हे आक्रमण यशस्वीपणे परतवून शत्रूला धूळ चारली. आज त्यांच्यामुळेच आपण घरात सुरक्षित राहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पुढे सांगते, “संपूर्ण देश स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी घरी बसलेला असताना आपले प्राण देशासाठी अर्पण करणा-या, आपल्यासाठी मरणयातना भोगायला मागे-पुढे न पाहता लढणा-या,  भारतीय सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणं, शक्य नाही. पण त्यांना ही आदरांजली.” ननवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली. गेल्या काही वर्षापासून तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली आहेत. 

Web Title: On the occasion of navratri, tejaswini pandit tribute to indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.