ठरावीक चौकटीच्या बाहेर येताहेत प्रेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:15 IST2016-01-16T01:11:41+5:302016-02-06T07:15:32+5:30
पूर्वी एकाच पद्धतीचे चित्रपट पाहायला लोकांना आवडायचं. पण गेल्या ८-१0 वर्षात चित्रपट असो वा नाटक अनेक वेगळे विषय लोकांपयर्ंत ...

ठरावीक चौकटीच्या बाहेर येताहेत प्रेक्षक
प र्वी एकाच पद्धतीचे चित्रपट पाहायला लोकांना आवडायचं. पण गेल्या ८-१0 वर्षात चित्रपट असो वा नाटक अनेक वेगळे विषय लोकांपयर्ंत पोहोचवले जात आहेत. त्यातून वेगळे विचार सर्वांपयर्ंत पोहोचत आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतही आहेत. त्यामुळे केवळ एकाच पद्धतीच्या कथानकात अडकलेले प्रेक्षक त्या चौकटीतून बाहेर पडू लागले आहेत. जसं की मनोरंजन करणारे चित्रपट पाहणे लोकांना आवडते तसेच फँड्री, किल्ला, कोर्ट, ख्वाडा असे वेगळा विचार देणारे चित्रपट पाहायलाही लोक प्राधान्य देत आहेत. मला अस वाटतं, हे खूप चांगलं द्योतक आहे, की आपल्याकडे इंट्रेस्टिंग सेन्सिबिलिटी तयार होत आहे. आणि त्यासाठी काही काळ लोटावा लागतो ती प्रक्रिया सध्या आपल्याकडे सुरू आहे याचा जास्त आनंद आहे.