"पुनर्जन्म नव्हे, पण...": प्रिया बापटची 'या' रुपात आईसोबत होते भेट! अभिनेत्रीने शेअर केला भावनिक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:47 IST2025-12-05T16:46:49+5:302025-12-05T16:47:11+5:30
Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापटला एका मुलाखतीत पुनर्जन्माबद्दल प्रश्न विचारला असता तिने एक अनुभव शेअर केला.

"पुनर्जन्म नव्हे, पण...": प्रिया बापटची 'या' रुपात आईसोबत होते भेट! अभिनेत्रीने शेअर केला भावनिक अनुभव
प्रिया बापट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलिकडेच तिचा असंभव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात तिच्यासोबत मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियाने अनेक ठिकाणी मुलाखती दिली. यावेळी तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील एक अनुभव सांगितला.
पुनर्जन्माबद्दल प्रश्न विचारला असता अभिनेत्री प्रिया बापटने एक अनुभव शेअर केला. 'असंभव' चित्रपटाच्या निमित्ताने लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले. प्रिया बापट म्हणाली की, ''एक खूप छोटीशी गोष्ट आहे. पुनर्जन्म असं म्हणणार नाही पण मला असं वाटतं की कुठेतरी एनर्जी एक्झिट करतात. माझ्या घरी ना गेल्या काही महिन्यांपासून ना माझी आई गेली तीन वर्षांपूर्वी आणि मी नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरी दिवशी पहिल्यांदा आमच्या खि़डकीत एक कावळा आला आणि तो अगदी त्यात गोष्टी खातो ज्या माझ्या आईला खूप आवडतात. म्हणजे साय, गोड पदार्थ आणि तो इतका काहीतरी तो आरडाओरडा करत नाही. तो काव काव करत नाही, काही नाही...तो एकटा कावळा येतो आणि खिडकीत शांतपणे बसतो. तो बरोबर दोन वेळेला येतो. सकाळी ८ वाजता सकाळी ८च्या आधीही येत नाही आणि नंतरही येत नाही. कारण तो वेळ आहे जेव्हा मी उठलेली असते. बाबा ब्रेकफास्टला असतात.''
''पुनर्जन्म म्हणून नाही पण या भावना असतात.''
''किचनच्याच खिडकीत येतो. बाकी कुठेही येत नाही. तर अशावेळेला मला असं वाटतं त्या कावळ्याला खायला घातलं ना की मला असं वाटतं की मी आईसाठी काहीतरी केलं. सो पुनर्जन्म म्हणून नाही पण या भावना असतात.'', असे प्रिया म्हणाली.