निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:04 IST2024-04-29T15:04:30+5:302024-04-29T15:04:50+5:30

निवेदिता एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांची जपणूक करतात.

Nivedita Saraf celebrated her pet dog's birthday | निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

मराठी कलाविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ.  विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  निवेदिता यांचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे.  निवेदिता एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांची जपणूक करतात. नुकतेच निवेदिता यांनी त्यांच्या पाळीव श्वानाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यााचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

निवेदिता यांच्या पाळीव श्वानाचे नाव सनी असं आहे.  सनी हा सराफ कुटुंबाचाच एक सदस्य आहे. नुकताच त्याचा वाढदिवस झाला. सनीच्या वाढदिवसानिमित्त घरी खास डेकोरेशन केलेलं पाहायला मिळालं आहे.  निवदिता यांनी 'हॅप्पी बर्थडे' सन्नी’ असं डेकोरेशन केल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे. शिवाय, अशोक सराफ यांच्यासह सर्वांनी टोपी घातल्याचंही दिसून येत आहे. सनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सनीच्या वाढदिवसाच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. 

निवेदिता सराफ यांनी मराठी सिनेसृष्टी तर गाजवलीच आहे. परंतु, काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांनी 1984 साली 'ये जो है जिंदगी','केसरी नंदन','सपनो से भरे नैना' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. तर 'किंग अंकल', 'सर आँखो पर', 'जायदाद' या हिंदी सिनेमातही त्या झळकल्या आहेत. लग्नानंतर १४ वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. 'मी स्वरा आणि ते दोघं', 'वाडा चिरेबंदी' नाटकांबरोबरच 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही त्यांनी काम केलं.

Web Title: Nivedita Saraf celebrated her pet dog's birthday