नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी दोरीने बनवलं होतं 'धनुष्यबाण', अखेर त्यामागचं कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 12:02 IST2023-08-04T11:31:45+5:302023-08-04T12:02:01+5:30
नितीन देसाईंच्या धनुष्यबाण बनवण्यामागचं कारण ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड

नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी दोरीने बनवलं होतं 'धनुष्यबाण', अखेर त्यामागचं कारण समोर
कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी (Nitin Desai) कर्जतच्या एनडी स्टुडिओतच गळफास घेत आत्महत्या केली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न पडले आहेत. त्यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं? कर्जाच्या बोज्याखाली आत्महत्या केली का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. दरम्यान त्यांनी गळफास घेण्याअगोदर दोरीच्या साहाय्याने धनुष्यबाण बनवलं होतं. तसंच एका व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्या धनुष्यबाणाचा नेमका काय अर्थ होता असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचा खुलासा व्हॉईस क्लिपमधून झाला आहे.
नितीन देसाईंनी एनडी स्टुडिओतील 'मराठी पाऊल पडते पुढे' च्या सेटवरच गळफास घेतला. आदल्याच रात्री ते दिल्लीहून मुंबईत परतले होते. माध्यम रिपोर्ट्सनुसार, गळफास घेण्याआधी त्यांनी दोरीच्या सहाय्याने जमिनीवर धनुष्यबाण बनवले होते. त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये धनुष्यबाणाचा उल्लेख करत सांगितलं की 'आता मी एनडी स्टुडिओचा धनुष्य खाली ठेवत आहे.'
नितीन देसाई यांचं पार्थिव सध्या जे.जे. रुग्णालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. तर संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार होणार आहेत.