​‘सैराट’ वर नितेश राणे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 12:55 IST2016-05-29T07:25:02+5:302016-05-29T12:55:02+5:30

नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत एक इतिहास रचला. कोट्यावधीचा गल्ला जमविलेल्या सैराटने खूप ...

Nitesh Rane barked at 'Sarat' | ​‘सैराट’ वर नितेश राणे भडकले

​‘सैराट’ वर नितेश राणे भडकले

गराज मंजुळे यांचा ‘सैराट’ सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत एक इतिहास रचला. कोट्यावधीचा गल्ला जमविलेल्या सैराटने खूप उंच भरारी घेतली आहे. मात्र काही ठराविक  वर्गाने या चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त केली असून टीका देखील केली आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी या सिनेमाविषयी वादग्रस्त वक्तव्य करूप टीकेची तोफ उधळली. सोलापुरात नुकताच मराठा आरक्षण एल्गार मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच ‘सैराट’ सिनेमावर त्यांनी टीका केली.

राणे म्हणाले, ‘‘मराठी सिनेसृष्टीत सैराट हा अतिशय चांगला सिनेमा आहे. त्याने कमाईही केली ही पण मोठी गोष्टी आहे. पण कला वेगळी आणि विषय वेगळा असतो. मराठ्यांची लायकी काढणारा सैराट सारखा सिनेमा ८० कोटींची कमाई करतो. तरीही मराठा समाज शांत बसतो. दुसरीकडे मात्र बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचवल्याचे दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो.’’

Web Title: Nitesh Rane barked at 'Sarat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.