SEE PICS : पुन्हा पडाल आर्चीच्या प्रेमात, रिंकू राजगुरूच्या फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 13:28 IST2019-10-29T13:27:47+5:302019-10-29T13:28:58+5:30
‘सैराट’ या सिनेमाने प्रकाश झोतात आलेली आणि रसिकांना वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे ताजे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

SEE PICS : पुन्हा पडाल आर्चीच्या प्रेमात, रिंकू राजगुरूच्या फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ
‘सैराट’ या सिनेमाने प्रकाश झोतात आलेली आणि रसिकांना वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे ताजे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत रिंकूने हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू गुलाबी रंगाच्या भरजरी साडीत दिसतेय.
एका फोटोत ती आपल्या फॅमिलीसोबत दिसतेय.
रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक ठसकेबाज संवाद, तिचा बुलेट अंदाज, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.
सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करू लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाºया रिंकूचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आता तिचा ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.