क्रांती आणि सोनालीची न्यू स्टाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:36 IST2016-08-30T08:06:06+5:302016-08-30T13:36:06+5:30
आपली स्टाइल काहीतरी वेगळी असावी. सगळयांपेक्षा आपण हटके दिसलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या स्टाइलने आपल्याला ओळखलं गेलं पाहिजे. हा प्रयत्न ...
.jpg)
क्रांती आणि सोनालीची न्यू स्टाइल
आ ली स्टाइल काहीतरी वेगळी असावी. सगळयांपेक्षा आपण हटके दिसलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या स्टाइलने आपल्याला ओळखलं गेलं पाहिजे. हा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यात कलाकार म्हटले की, ते या गोष्टी आवर्जुन करत असतात. असचं काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी केला आहे. या दोघी नेहमीच आपल्या लाजवाब स्टाइलमध्ये वावरताना दिसत असतात.पण यंदा या दोघींनी ही हटके स्टाइल केली आहे. क्रांती आणि सोनालीने नाकात नोझ पिन्स असलेला एक झक्क ास फोटो सोशलमिडीयावर अपलोड केला आहे. त्यांच्या या स्टाइलने सर्वाचे लक्ष वेधित केले आहे. त्यांच्या या न्यू स्टाइलला सोशलमिडीयावर प्रचंड लाइक्सदेखील मिळत आहेत. त्यांनी या नोझ पिन्सचे श्रेय अभिनेत्री मंजिरी ओकला दिले असल्याचे सोशलमिडीयावर सांगितले आहे. पण या नोझ पिन्सची स्टाइल मराठी इंडस्ट्रीमध्ये हिट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने आपल्या नोझ पिन्सने सर्वाना आकर्षित केले होते. असो, पण सोनाली आणि क्रांतीचा हा न्यू लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे हे मात्र खरं आहे.
![]()