'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, फोटो शेअर करत केला खुलासा
By तेजल गावडे | Updated: September 28, 2020 17:50 IST2020-09-28T17:50:16+5:302020-09-28T17:50:47+5:30
सईने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, फोटो शेअर करत केला खुलासा
बिग बॉस मराठी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरात पोहचली. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. मात्र नुकतीच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सईने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
सईने फोटो शेअर करत लिहिले की, स्वर्गातून गाठी बांधल्या जातात, असे म्हणण्यासाठी माझ्याकडे खूप कारणं आहेत. आणि अखेर मला माझा व्यक्ती मिळाला.
सईने फोटो शेअर केला आहे ज्यात सई आणि तिचे ज्याच्यावर प्रेम आहे तो व्यक्ती पाठमोरे उभे आहेत. त्यामुळे सई कुणाच्या प्रेमात पडली आहे हे समजू शकलेले नाही. मात्र ती लवकरच याबद्दल सांगेल अशी आशा करूयात.
अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.
२०१५ साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.