.जुन्या-नव्या पिढीचा फॅमिली कट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 15:08 IST2016-10-03T09:38:55+5:302016-10-03T15:08:55+5:30

   फॅमिली कट्टा या चित्रपटाचे दिग्दशर्न चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपचा संदभार्त त्यांनी अनेक गाेष्टींचा उलगडा केला ...

. New-generation family farm | .जुन्या-नव्या पिढीचा फॅमिली कट्टा

.जुन्या-नव्या पिढीचा फॅमिली कट्टा

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
 फॅमिली कट्टा या चित्रपटाचे दिग्दशर्न चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपचा संदभार्त त्यांनी अनेक गाेष्टींचा उलगडा केला आहे. कुटूंबावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजपर्यंत आले आहेत. परंतू फॅमिली कट्टा या चित्रपटातून एक वेगळी गाेष्ट मांडण्यात आली आहे. या संदर्भात चंद्रकांत कुलकर्णी सांगतात, सध्याचे फॅमिली स्ट्रक्चर बदलले आहे. समाजही बदलत चालला आहे. फॅमिलीत आपण आता एकमेकांशी जाेडलेलाे आहोत का असा प्रश्न आहे. त्यामुळे जुनी आणि नवी पिढी यांनी एकत्र येऊन या चित्रपटाचा घाट घातला आहे. आजच्या घडीला पूर्णपणे साजेसा असा हा चित्रपट आहे. पूर्वी कुटुंबाचा एक डॉक्टर असायचा आणि त्याच्याकडे जाऊन कौटुंबिक प्रश्नही मांडले जायचे. आता ही परिस्थिती बदलली आहे. पण यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. हा चित्रपट केवळ संदेश देणारा नव्हे; तर अनुभव देणारा असा चित्रपट आहे. कामाच्या निमित्ताने कुटुंबातल्या व्यक्ती शरीराने जरी दूर राहिल्या तरी मनाने मात्र त्या दूर राहू नयेत अशी या चित्रपटाची विचारधारणा आहे. निर्मात्या वंदना गुप्ते यांनी माझ्या नाटकांत भूमिका केल्या आहेत आणि या चित्रपटासाठी त्या निर्मात्याच्या भूमिकेत असल्याने माझ्यासाठी तो एक कम्फर्ट झोन होता. 

Web Title: . New-generation family farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.