"हो ना तुझा नाद कोण करणार बाई.." प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:01 IST2022-09-20T17:59:23+5:302022-09-20T18:01:35+5:30

प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Netizens' comments on Prajakta Mali's post | "हो ना तुझा नाद कोण करणार बाई.." प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

"हो ना तुझा नाद कोण करणार बाई.." प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत येत असते. दरम्यान अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर एक  पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

प्राजक्ता आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेलीय. तिथून तिनं आपले फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिले, मैं जहाँ रहूँ..मैं कहीं भी हूँ …तेरी याद साथ है । (गैरसमज नसावा , प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय..) प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. समजूत पण भारी कडलाय सगळ्यांची, कांचा लडकी, लय भारी आहे तू खरंच, हो खरच् ना तुझा नाद कोण करणार बाई..काय खाते ग तू प्राजक्ता एवढी गोड आहेस तर. 

वर्कफ्रंट...
सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वी भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून ब्रेक घेऊन प्राजक्ताने थेट लंडन गाठले आहे. ती मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

Web Title: Netizens' comments on Prajakta Mali's post