लग्नाला काही दिवस उरले असताना या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबत केलं लिपलॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:23 IST2020-01-02T13:22:52+5:302020-01-02T13:23:08+5:30
गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री लग्नामुळे चर्चेत आहे.

लग्नाला काही दिवस उरले असताना या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबत केलं लिपलॉक
बिग बॉस १२ची स्पर्धक व मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती बिझनेसमॅन शार्दुल सिंग बयाससोबत लग्नबेडीत अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या रितीरिवाजाला सुरूवात देखील झाले आहे. या रिवाजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहा व शार्दुल बऱ्याच वेळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ५ जानेवारीला ते दोघं महाराष्ट्रीय पद्धतीनं विवाह बंधनात अडकणार आहेत.
नेहा पेंडसे हिने भावी पतीसोबत न्यू ईयर सेलिब्रेशनदेखील केलं. यादरम्यानचा तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने शार्दुलला मिठी मारली असून ती त्याला लिपलॉक किस करते आहे. तिच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो शेअर करत नेहाने २०१९ला अलविदा केलं आहे आणि २०२०चं स्वागत केलं आहे.
येत्या ५ जानेवारीला बॉयफ्रेंड शार्दुलसह लग्न करत नेहा आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो शेअर केली आहेत.
नेहा तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता.
केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.