Nehha Pendse's Wedding : वर्षाच्या सुरूवातीलाच लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री, लग्नाच्या विधींना सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 12:52 IST2019-12-31T12:49:20+5:302019-12-31T12:52:36+5:30
Nehha Pendse's Wedding : लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर नेहाचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.

Nehha Pendse's Wedding : वर्षाच्या सुरूवातीलाच लग्नबंधनात अडकणार ही मराठमोळी अभिनेत्री, लग्नाच्या विधींना सुरूवात
आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री नेहा पेंडसेचे लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेहा पेंडसे तिच्या लग्नाची चर्चा सुरू होती. येत्या 5 जानेवारीला बॉयफ्रेंड शार्दुलसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो शेअर केली आहेत.
नेहा तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर नेहाचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.
नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.