नेहा पेंडसेचा झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 17:43 IST2016-12-23T17:43:40+5:302016-12-23T17:43:40+5:30
अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या कामाच्या बाबतीत पॅशनेट असल्याचे पाहायला मिळते. नेहाने अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच नेहाने ...
.jpg)
नेहा पेंडसेचा झाला अपघात
अ िनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या कामाच्या बाबतीत पॅशनेट असल्याचे पाहायला मिळते. नेहाने अनेक मराठी चित्रपट केले आहेत. तसेच नेहाने साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील स्वत:चा ठसा उमटविला आहे. सध्या ती एका हिंदी चॅनेलवरील मालिकेमध्ये काम करीत आहे. या मालिकेच्या सेटवर नेहाला दुखापत झाल्याचे समजतेय. या मालिकेतील एका सीनच्या शूटिंग दरम्यान नेहा जखमी झाली आहे. लाईफ ओके वाहिनीवरील 'मे आय कम इन मॅडम' मालिकेचे शूटींग सुरू होते. यात नेहा आक्रमक बॉसची भूमिका साकारत असते. आम्ही पायºयांवर शूटींग करीत होतो आणि चुकून माझा पाय घसरला आणि मी कोसळले. कितपत मार लागलाय हे कळत नव्हते. पण जेव्हा माझ्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर काही दिवस कंपल्सरी बेड रेस्ट घ्यायला सांगितली तेव्हा याचे गांभीर्य लक्षात आले,असे नेहाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुढील चार दिवस कोणतीही हालचाल करु नका असा सल्ला नेहाला डॉक्टरांनी दिला आहे. ती जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तिचे सीन्स शूट न करण्याचा निर्णय प्रॉडक्शन हाऊसने घेतला आहे. सेटवर कलाकारंचे असे छोटे मोठे अपघात तर होतच असतात. परंतू चित्रीकरणस्थळी थोडी सेफ्टी असणे देशील आवश्यक आहे. त्यामुळे सेटवर जर अपघात झालाच तर लगेचच त्यावर उपचार करता आले पाहीजेत. नेहाला आता डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नेहामुळे या मालिकेचे चित्रीकरण देखील थांबले आहे. तसेच सध्या नेहाकडे अनेक चित्रपट देखील आहेत. आता या अचानक झालेल्या दुखापतीमुळे नेहाला घरी बसून आरामच करावा लागणार आहे. परंतू नेहामुळे बºयाच चित्रपटांचे आणि मालिकांचे मात्र काही खरे नाही असेच वाटत आहे. त्यामुळे लवकरच नेहा बरी व्हावी असेच सध्या सर्वजण बोलत असतील.