बाबो..! नेहा महाजन करतेय चक्क फॉरेनरला डेट, व्हॅलेंटाइन डे निमित्त पहिल्यांदा दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:03 IST2022-02-14T14:02:45+5:302022-02-14T14:03:08+5:30
अभिनेत्री नेहा महाजन(Neha Mahajan)ची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

बाबो..! नेहा महाजन करतेय चक्क फॉरेनरला डेट, व्हॅलेंटाइन डे निमित्त पहिल्यांदा दिली प्रेमाची कबुली
कलाकार म्हटलं की त्याचे चाहते आलेच. चाहत्यांना त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. दरम्यान आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर सेलिब्रेटींनी स्पेशल पोस्ट शेअर केल्या आहेत. तशीच पोस्ट अभिनेत्री नेहा महाजन (Neha Mahajan) हिने देखील इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमधून तिने प्रेमाची कबुली दिली आहे.
नेहा महाजनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. तिने या व्हिडीओसोबत सर्वांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहा महाजनच्या बॉयफ्रेंडचे नाव ब्रॅडली ड्युन्स आहे.
अभिनेत्री नेहा महाजनने 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती रणवीर सिंगच्या सिंबा चित्रपटातही झळकली आहे. 'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.